नवी दिल्ली : बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरील आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाची नवीन तारीख दिली आहे. आता ही सुनावणी 12 ऑगस्टला होणार आहे. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पूजा खेडकरनी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
पटियाला हाऊस न्यायालयाने 1 ऑगस्टला पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नागरी सेवा परीक्षेत परवानगीपेक्षा जास्त संधी मिळविण्यासाठी तिने स्वत:ची खोटी ओळख करून दिल्याचा आरोप तिच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारी पुन्हा ठेवण्यात आली आहे.
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने गेल्या आठवड्यात तिची याचिका फेटाळल्यानंतर खेडकरनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये असे आढळून आले की नागरी सेवा परीक्षेत अतिरिक्त प्रयत्नांसाठी खोटी ओळख पटवण्याशी संबंधित आरोप आहेत. ट्रायल कोर्टाचे न्यायमूर्ती याबाबत म्हणाले की, संपूर्ण घटनेचा उलगडा करण्यासाठी आणि यामध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा सहभाग निश्चित करण्यासाठी आरोपीची कोठडीत चौकशी आवश्यक आहे.