पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुळशीतील शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी येरवडा कारागृहात असलेल्या मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर गुरुवारी (१ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. सत्र न्यायाधीश अजित मरे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा, वडील दिलीप यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झालेल्या मनोरमा यांना ग्रामीण पोलिसांच्या पथकाने महाड परिसरातून अटक केली.
दिलीप यांना नुकताच जामीन मंजूर करण्यात आला आहे, तर मनोरमा यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, सध्या त्या येरवडा कारागृहात आहेत. या गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी मनोरमा यांनी ॅड. सुधीर शहा यांच्यामार्फत अर्ज केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होती. मात्र, काही कारणास्तव सुनावणी झाली नाही. खेडकर यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.