कर्नल पुरोहितच्या याचिकेवरील सुनावणी 7 ऑगस्टपर्यंत तहकुब

मुंबई : आपल्यावर यूएपीएअंतर्गत केलेली कारवाई रद्द करण्यात यावी, यासाठी मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित याने उच्च न्यायालयात एक याचिका केली होती. याच याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने 7 ऑगस्टपर्यंत तहकूब केली. गुरुवारच्या सुनावणीत पुरोहितच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्या. इंद्रजीत महंती व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे युक्तिवाद केला.

बेकायदा हालचाली (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) अंतर्गत कारवाई करण्यासाठी राज्य सरकारने दिलेली परवानगी अवैध असल्याचे पुरोहितने आपल्या याचिकेत म्हटले होते. पुरोहितला कोणीतरी यामध्ये नाहक गोवले आहे. त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. ते निर्दोष असल्याचे मी सिद्ध करेन. त्यांची सन्मानाने या केसमधून निर्दोष म्हणून सुटका केली पाहिजे, असे रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले. पुरोहित भारतीय लष्करात काम करीत आहेत. ते कधीच अशा दहशतवादी कृत्यात सहभागी नव्हते. हिंदू दहशतवादी संघटनेशी त्यांचा कधीच संपर्क नव्हता, असेही रोहतगी यांनी न्यायालयाला सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.