हितसंबंध प्रकरणाची सुनावणी 20 मे रोजी

दुबई – हितसंबंधांच्या मुद्‌द्‌यावरून लक्ष्य झालेला सचिन तेंडुलकरने मंगळवारी भारतीय क्रिकेट बोर्डाचे चौकशी अधिकारी व माजी न्यायमूर्ती डी. के. जैन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजरी लावली होती. मात्र, या सुनावणीतून फारसे काही निष्पन्न न झाल्याने पुढील सुनावणी 20 मे रोजी ठेवण्यात आली आहे. पुढील सुनावणीस त्याने येण्याची आवश्‍यकता नसल्याचे संबंधीत सुत्रांनी सांगितले आहे.

24 एप्रिलला सचिनविरोधात हितसंबंधांच्या मुद्‌द्‌यावरून तक्रार करण्यात आली होती. तो आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक आणि क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य असण्यावरून ही तक्रार केली गेली होती. मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी ही तक्रार केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.