आरोग्यवर्धक हळदी

घराघरातील किचनमध्ये सहज मिळणारी आणि वेगवेगळे पदार्थ तयार करताना वापरली जाणारी हळद आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सर्वाना माहित आहे. हळद डायबेटिस, लिव्हरची समस्या, पिंपल्स आणि त्वचेसाठी फायदेशीर मानली जाते.

अँटिऑक्‍सिडंट आणि अँटी इन्फ्लामेट्री गुण असलेली हळद फ्री रॅडिकल्स सोबत लढण्यास मदत करते. तसेच शरीरात होणाऱ्या वेदना आणि सूज कमी करण्यासही मदत करते. हळदीमध्ये अँटिसेप्टिक आणि पोटॅशियम, ओमेगा 3फॅटी ऍसिड, प्रोटीन, कार्बोहायड्रेट तसेच फायबर्स असतात.

कसा कराल हळदीचा चहा –
हळदीचा चहा तयार करण्यासाठी ताजी हळद, हळद पावडर किंवा हळकुंडाचाही वापर करू शकता. चहा तयार करण्यासाठी 2 कप पाणी, अर्धा चमचा बारीक केलेला आलं, 1 चमचा हळद पावडर, अर्ध लिंबू आणि 1 चमचा मध घ्यावे. पाणी उकळून त्यात आल्याचे तुकडे व 1 चमचा हळद पावडर टाका. गॅस बंद करून चहा 5 ते 6मिनिट झाकून ठेवा. चहा गाळून त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 चमचा मध टाकून हा चहा घेऊ शकता.

2.हळदीचं दुध – हळदीचं दूध पिण्याचे अनेक फायद्याबद्दल वारंवार बोलला जाते. सर्दी, खोकला, जखम इत्यादी आजार बरे होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढते. वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. आपल्या कॅलरीही जलद गती ने कमी होतात. झोपण्याआधी दूध पिणे उत्तम पर्याय आहे.
डॉ आदिती पानसंबळ , आहारतज्ज्ञ, नगर. संपर्क : 7385728886.

Leave A Reply

Your email address will not be published.