प्राचीन काळापासून, दुधाकडे आरोग्यासाठी गुणकारी औषध म्हणून पाहिले जाते. दूध संपूर्ण आणि पौष्टिक अन्न आहे, ज्यामध्ये कॅल्शियम, सोडियम, प्रथिने, जीवनसत्त्वे (ए, के आणि बी 12), अमिनो ऍसिडस्, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स आणि इतर महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात जे शरीरात ऊर्जा संक्रमित करतात. “जागतिक दूध दिना’निमित्ताने दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.
दुधामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. रक्तदाब नियंत्रित असल्याने हृदयावर ताण येत नाही. त्यामुळे हृदयासंबंधी कोणत्याही समस्या उद्भवत नाही. हृदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी दूध पिणे कधीही चांगले.
दूध पिण्यामुळे त्वचेसंबंधातील समस्या दूर ठेवण्यास मदत होते. दूध हे त्वचेला कोमल, मुलायम आणि चमकदार बनवते. दुधामध्ये त्वचेसाठीचे उपयुक्त असे सर्व व्हिटॅमिन्स आणि पोषकतत्त्वे असतात. त्यामुळे दिवसातून दोन ग्लास दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे.
स्नायूंच्या विकासात दूध सहाय्यक ठरते. अनेक धावपटू व्यायाम केल्यानंतर दूध पिणे पसंत करतात, त्यामुळे स्नायूंना पोषक तत्त्वे मिळतात. दूध पिण्याने स्नायुमधील वेदनाही दूर होते. रात्री दूध पिल्यामुळे त्वचेसाठी बरेच फायदे होऊ शकतात.
नियमितपणे दुधाचे सेवन केल्याने त्वचेला एक तरुण देखणेपणा मिळू शकतो. दुधात व्हिटॅमिन बी 12 असते जे त्वचेची लवचिकता सुधारण्यास मदत करते. दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन ए नवीन पेशी रचना तयार करण्यास मदत करते आणि त्वचेच्या विविध आजारांशी लढायला मदत करते.
मधुमेह रुग्णांच्या हाडांमध्ये अशक्तपणा असतो, ज्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवतो. त्यांच्यासाठी, रात्री साखर न घालता अर्धा कप दूध पिणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे.
रात्री थोडी हळद घालून तयार केलेले कोमट दूध पिणे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दूर करण्यासाठी फायदेशीर नैसर्गिक उपाय ठरू शकतात. हळद-दुधाचे अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म शरिरासाठी खूप फायदेशीर आहे.
वजन कमी करण्याची चिंता न करता फक्त एक कप गरम दूध पिणे फायदेशीर आहे. दूध हे प्रथिनांचे स्रोत आहे जे रक्तातील साखरेचे योग्य स्तर राखण्यात आणि उर्जेची पातळी कमी करण्यास मदत करते. क्रीमपेक्षा कमी फॅक्ट असलेले दूध अधिक प्रभावी आहे.