पुणे : करोना संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता नागरिकांचे लसीकरण, करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना तसेच शहर स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रभाग क्रमांक 34 मधील महापालिका कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळासह भेट वस्तू देण्यात आल्या.
स्थानिक नगरसेवका ज्योती किशोर गोसावी यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या उपक्रमात भाजपचे युवा सरचिटणीस करण सतीश मिसाळ यांच्या हस्ते दिवाळी भेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी केतन गोसावी, नलीनी गोसावी, अभिजित कदम, चंद्रभागा गोसावी, विश्वास ननावरे, प्रशांत दिवेकर, राजेंद्र सरदेशपांडे, शैलेश देशपांडे, राजू कदम, बाळू खर्डे, महिला आघाडीचा विशाखा कुलकर्णी, अर्पिता कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या कर्मचाऱ्यांकडून गेल्या दिड वर्षांपासून अहोरात्र जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा केली जात असून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कर्मचाऱ्यांनी बजाविलेल्या कामाचे मोल कोणत्याही उपक्रमात होणार नसले तरी सर्वांच्या आनंदात त्यांचाही सहभाग असावा या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आल्याचे नगरसेविका गोसावी यांनी यावेळी बोलताना सांगितले.