Health Tips | परीक्षाकाळात ‘हे’ सुपरफूड्स देऊन वाढवा मुलांची ‘स्मरणशक्ती’ 

परीक्षेच्या दिवसांत मुलांमध्ये वेगवेगळे टेन्शन असते. चांगल्या निकालांसाठी त्यांचे निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून ते चांगले पेपर देऊ शकतात. अशा परिस्थितीत पालकांनी त्यांच्या आहारात काही खास गोष्टींचा समावेश केला पाहिजे. जेणेकरून त्यांची बुद्धी योग्यरित्या सक्रिय राहू शकेल आणि स्मरणशक्ती वाढविण्यात मदत होईल. तर चला आज आम्ही तुम्हाला काही सुपर फूड्स सांगू ज्यामुळे मुलाची स्मरणशक्ती बळकट होण्याबरोबरच तणाव कमी करण्यात मदत होईल.

* घरी बनवलेले पोहे, उपमाच योग्य
परीक्षेच्या वेळी हवाबंद डब्यातील पदार्थ आणि ओट्स खाल्ल्याने आळशीपणा व सुस्ती वाढू शकते. अशा परिस्थितीत घरी पोहे किंवा उपमा बनवून मुलांना खायला घाला. यामुळे पोट व्यवस्थित भरल्याने मुलांचा तणाव कमी होईल. त्यांची स्मरणशक्ती वाढत गेल्याने त्यांना दिवसभर तरतरीत वाटेल.

* दही
दह्यात पोषक, अँटी-ऑक्सिडंट्स आणि चांगले जीवाणू असतात. हे पचन सुरळीत राखतानाच सेरोटोनिन नावाचे संप्रेरक वाढविण्यास मदत करते. त्यामुळे परीक्षेच्या वेळी तणाव कमी होण्यास मदत होईल. तसेच, ते तीव्र उष्णतेपासून मुलांचे संरक्षणही करते. म्हणूनच, परीक्षेला जाण्यापूर्वी मुलांना दह्यात साखर मिसळून दिली पाहिजे.

* तांदूळ
तांदूळ प्रीबायोटिक आहे. म्हणून ते घेतल्यास पोट हलके राहते आणि पोटाशी संबंधित त्रास कमी होतो. हे पोट फुगणे, पोट दुखणे अशी कोणतीही समस्या टाळण्याबरोबरच चांगली झोप घेण्यास मदत करते. यामुळे दिवसभर ऊर्जावान आणि ताजे वाटते. यासाठी साधा भात, खिचडी, दही भात असे हलके पदार्थ डिनरमध्ये मुलांना खाऊ घालता येतात.

* शुद्ध तूप
देशी किंवा शुद्ध तूपात सर्व योग्य पदार्थ आणि अँटी-ऑक्सिडंट्स सहित ओमेगा 3 फॅटी ऍसिड देखील असतात. यामुळे मेंदूचे चांगले कार्य होते. स्मरणशक्ती तल्लख झाल्यामुळे वाचलेला सगळा अभ्यास लक्षात राहतो. यासाठी, विशेषतः परीक्षेच्या दिवसात, मुलाला न्याहारीपासून रात्रीच्या जेवणापर्यंत किमान 1 चमचा तूप द्यायलाच पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.