Summer Health Tips | उन्हाळ्यात ‘डिहायड्रेशन’पासून वाचण्यासाठी खा ‘हे’ फळ; मिळतील इतरही बरेच फायदे!

उन्हाळ्याच्या काळात खाण्यापिण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून डिहायड्रेशन आणि इतर रोग टाळता येतील. यासाठी, दररोजच्या आहारात किवी फळाचा समावेश करणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये सी आणि ई जीवनसत्त्वे पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी आणि औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे दररोज 1 किवीचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. चला तर मग त्याच्या इतर फायद्यांविषयी जाणून घेऊया.

– डेंग्यूमध्ये फायदेशीर
डेंग्यूच्या रुग्णांसाठी किवीचे सेवन केल्यास त्वरीत रिकव्हर होण्यास मदत होते. याशिवाय रक्तातील प्लेटलेट्स वाढविण्यासाठीही किवी खूप फायदेशीर मानले जाते.

– रक्तदाब नियंत्रण
एका संशोधनानुसार, सलग 8 आठवड्यांपर्यंत किवी खाल्ल्याने हाय बीपीची समस्या दूर होते. तसेच हृदय अधिक चांगले कार्य करते. हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी असतो.

– स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका कमी
दररोज 1 किवीचे सेवन केल्यास रक्ताच्या गुठळ्या होण्यास त्रास कमी होतो. त्यामुळे स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका अनेक पटींनी कमी होतो.

– पोटाच्या तक्रारी होतात दूर
नियमितपणे किवीचे सेवन केल्यास पचनयंत्रणा मजबूत होते. यामुळे गॅस, आंबटपणा, अपचन, पोटदुखीसारख्या समस्या दूर करण्यात मदत होते.

– वजन कमी होते
वाढत्या वजनाने त्रस्त असलेल्या लोकांनी आपल्या रोजच्या आहारात किवी समाविष्ट केलेच पाहिजे. मुळात किवी कमी कॅलरीज आणि फायबर असलेले एक फळ आहे. त्यामुळे किवी खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

– मोसमी रोगांपासून बचाव
अँटी ऑन्क्सिडेंट गुणधर्म असलेल्या किवीचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप इत्यादी हंगामी रोगांपासून संरक्षण होते.

– दम्याचा त्रास होतो कमी
दम्याच्या रूग्णांसाठी व्हिटॅमिन-सी समृद्ध पदार्थ फायदेशीर असतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन सी ने भरलेल्या कीवीचे सेवन केल्यास श्वासोच्छ्वास प्रक्रिया योग्य प्रकारे कार्य करते. त्यामुळे दम्याचा धोका कमी होतो.

– गरोदरपणात फायदेशीर
पौष्टिक आणि अँटी-ऑक्सीडंट्स गुणधर्मांनी युक्त किवी खाणे गरोदरपणात फायदेशीर ठरते. त्यातील फोलेट, व्हिटॅमिन सी शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यास मदत करते. यामुळे गर्भपात होण्याचा धोका कमी असतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.