मुंबई – देशासमोर उभ्या असलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, वरूण धवन, सनी देओल, अजय देवगण, कार्तिक आर्यन, नाना पाटेकर यांनी करोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यातच बॉलिवूडच्या किंग शाहरुख खानने पुन्हा एकदा करोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
Many thanks Mr. Shah Rukh Khan for your kind contribution of 25,000 PPE kits. This will go a long way in supporting our fight against COVID19 & protecting our frontline medical care team @iamsrk @MeerFoundation @CMOMaharashtra
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 13, 2020
दरम्यान, शाहरुख खानने हा सहभाग बघता पुन्हा एकदा त्याने महाराष्ट्र सरकारला २५ हजार ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट’ (पीपीई) कीट पुरविल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने केलेल्या या मदतीमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शाहरुख खानचे आभार मानले आहेत.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट केलं कि “शाहरुख खान यांनी २५ हजार पीपीई कीट देऊन जो मदतीचा हात पुढे केला आहे. त्यासाठी त्यांचे मनापासून आभार. करोना विषाणूविरुद्ध लढा देण्यामध्ये याची आम्हाला मदत होईल आणि वैद्यकीय उपचार टीमच्या आरोग्याची काळजीदेखील घेतली जाईल”.आरोग्य मंत्र्यांनी ट्विट केल्यानंतर शाहरुखनेदेखील त्यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे.