चिंताजनक ! डेल्टा प्लस विषाणूसंदर्भात आरोग्यमंत्री टोपेंची महत्त्वपूर्ण माहिती; म्हणाले…

मुंबई – करोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. मात्र लगेच करोनाचा घातक ठरत असलेल्या डेल्टा प्लस या विषाणूमुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. या संदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी आज येथे दिली.

टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सीएसआयआर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात येणार आहे.

मागील १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आल्याचे टोपे यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.