आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना करोनाची लागण

मुंबई – राज्यात करोना रुग्णांची संख्या आता वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून करोना काळातील नियम आणखी कडक करण्यात आले आहे. राज्यात आलेल्या दुसऱ्या लाटेत आता राजकीय नेत्यांनाही संसर्ग होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना करोनाची लागण झाली आहे. यासंदर्भातील राजेश टोपे यांनी स्वतः माहिती दिली.

माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने करोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली करोना चाचणी करून घ्यावी, असे  आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.

दरम्यान, आज राज्यात5427 नवे पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 38 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.48 % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,55,21,198 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 20,81,520 (13. 41 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,16,908 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,743 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.