पुणे ते पाबळ सायकल प्रवासातून आरोग्याचा संदेश

पाबळ – आरोग्यम धनसंपदा म्हणत पुण्यातील एका कुटुंबाने सायकलवर ७० किलोमीटरचा प्रवास करत पाबळ गाठले आहे. प्रवासाचा शेवट त्यांनी जैन मंदिरात दर्शन घेऊन केला. सत्येंन शहा असे या कुटुंबाचे नाव असून आरोग्य आणि प्रदूषण रोखण्याचा अनोखा संदेश त्यांनी या सायकल प्रवासातून दिला आहे. याची दाखल घेत मंदिराच्या ट्रस्टनेही सत्येंन शहा कुटुंबाचा सत्कार केला.

पुणे येथील ‘लिव्ह लाईफ विदाऊट मेडिसिन’ या संस्थेचे सदस्य असलेले आणि व्यवसायिक सत्येंन शहा हा उपक्रम राबवतात. या बाबत बोलताना45 वर्षाचे सत्येंन शहा यांनी म्हंटले कि, आठवड्यातून एकदा तरी सायकलवर दीर्घ टप्प्याचा प्रवास केला तर आयुष्यात कधीही औषधाची गोळी घ्यावी लागणार नाही, असा संदेश त्यांनी दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.