काश्‍मीर ते कन्याकुमारी सायकल प्रवासातून आरोग्याचा संदेश

शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बारामती क्‍लबच्या आठ जणांचा निश्‍चय

बारामती -ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आरोग्यविषयक संदेश देण्यासाठी येथील बारामती सायकल क्‍लबच्या आठ सदस्यांनी काश्‍मिर ते कन्याकुमारी असा चार हजार किमी अंतराचा सायकल प्रवास सुरु केला आहे.

बारामती सायकल क्‍लबचे संजय संभाजी दराडे, सुवर्णा संजय दराडे, सारिका संजय दराडे, राधिका संजय दराडे, राजेंद्र लक्ष्मण ठवरे, सोनाली राजेंद्र ठवरे, अजित दाजीसाहेब चव्हाण, हनुमंत शरणप्पा क्षेत्री या आठ जणांनी जम्मूमधील गुरुद्वारापासून या सायकल प्रवासास 12 डिसेंबर रोजी प्रारंभ केला आहे. त्यांच्या समवेत सायकल क्‍लबचे अविनाश भोसले, सचिन खाडे आहेत. शरद पवार यांना दीर्घायू लाभावे व सायकलचा प्रचार व प्रसार व्हावा या दुहेरी उद्देशाने या आठ जणांनी या प्रवासास प्रारंभ केला आहे.

या आठ जणांनी पहिल्या टप्प्यात जम्मू ते गुरुदासपूर असे 137 किमीचे अंतर पूर्ण केले आहे. पाऊस येऊनही त्यांनी सायकल प्रवास न थांबविता तसाच सुरु ठेवला होता. ज्या ज्या ठिकाणी हे सायकलस्वार जातात तेथे त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत असून त्यांना पाठिंबाही मिळत आहे. एक महिन्यात हे अंतर पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.