आरोग्याचा परिणाम थेट संपत्तीवर

वॉशिंग्टन – जास्त संपत्ती  जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीप्रमाणे जगात निरोगी लोक जास्त संपत्ती कमवतात तर कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न कमी असते आणि सतत घटत असते अमेरिकेत झालेल्या एका संशोधनाचा हवाला देऊन जागतिक आरोग्य संघटनेने ही माहिती दिली आहे

निरोगी लोक आपल्या आयुष्य काळामध्ये 28 टक्के जास्त संपत्ती कमावतात असे या अहवालात म्हटले आहे या संशोधनाप्रमाणे ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यातील सोळा ते वीस वर्षे आजारपणात घालवतात त्यांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागते आणि परिणामी त्यांच्या उत्पन्नातही घट होते.

जागतिक आरोग्य संघटनेने या संशोधनाच्या निमित्ताने भारतातील आरोग्य विषयक चित्रही समोर ठेवले आहे त्याप्रमाणे भारतातील जवळजवळ 68 टक्के लोक आरोग्याचा खर्च आपल्या खिशातून करतात. जागतिक पातळीवरील ही सरासरी फक्त 18 टक्के आहे.

आरोग्यावर होणाऱ्या खर्चामुळे गरीब लोक अधिकच गरीब होत हातात पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या 2017-18 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालाप्रमाणे साडेपाच कोटी भारतीय केवळ आजारपण आणि औषधवरील खर्चामुळे दारिद्र्यरेषेखाली ढकलले गेले.

भारतात ग्रामीण भागात हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा सरासरी खर्च सोळा हजार 676 रुपये तर शहरांमध्ये हा खर्च 27 हजार रुपये आहे त्यात भारतात अद्यापही आरोग्य विमा विषयक पुरेशी जनजागृती न झाल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. भारतातील ग्रामीण भागातील 14 टक्के लोकांकडे आणि शहरी भागातील फक्त एकूण 19 टक्के लोकांकडे आरोग्य विमा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.