पुणे -परदेशांतून भारतात आलेल्या 44 जणांना त्यांच्या घरातच 14 दिवसांसाठी विलग केले आहे. चीनमध्ये करोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर परदेशातून आलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. त्या अंतर्गत उपाय केला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दररोज रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली जात आहे. सर्दी, ताप, खोकला, इतर लक्षणे आढळल्यास तातडीने डॉ. नायडू रुग्णालयात दाखल होण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.