मुंबई – आरोग्य विभागाच्या रद्द झालेल्या परीक्षेचा अखेर मुहुर्त ठरला आहे. या परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप झाला होता. यानंतर आता गट “क’ची परीक्षा 24 ऑक्टोबर, तर गट “ड’ची परीक्षा 31 ऑक्टोबर घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
तसेच परीक्षेच्या तयारीसाठी डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
राजेश टोपे म्हणाले, यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असे म्हटले आहे. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठतात. त्यावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.
कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात, काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असे आवाहनही त्यांनी केले.