आळंदी (पुणे)-माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत शुक्रवार व शनिवारी (दि. 18 व 19) संपूर्ण आळंदी शहर बंद राहणार आहे. यावेळी घरोघरी सर्वेक्षण माहिमेअंतर्गत प्रत्येकाची तपासणी करण्यात येणार आहे.
खेड आळंदी चाकण या मोठ्या लोकसंख्येच्या संख्येच्या शहरांसह तालुक्यातील खेडोपाडी जाऊन महाराष्ट्र शासनाचे आरोग्य कर्मचारी महा तपासणी अभियान राबवणार असून, आपल्या घरी येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यास आरोग्यरक्षकास सहकार्य करून आपापली व आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आव्हान त्यांनी खेड तालुक्यातील आम जनतेला केले आहे. करोनाच्या संसर्गजन्य महामारीचा आलेख खेड तालुक्यात दिवसेंदिवस वाढत चालला असून, ही साखळी सोडण्यासाठी सलग दोन दिवस हा प्रयोग आपणास यशस्वी करून दाखवायचा आहे. या महामारीवर मात करण्यासाठी आपण सर्वांनी घरातच राहून इतर सर्व कामे बाजूला ठेवून शासनास सहकार्य करावे असेही आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.