वाघोली : नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे ठरतात संजीवनी – दिलीप वाल्हेकर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

वाघोली : नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी वेळोवेळी त्यांची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे असून याद्वारे नागरिकांच्या आरोग्याचे निदान होण्यास मदत होणार असून ही आरोग्य शिबिरे नागरिकांसाठी संजीवनी ठरत असल्याचे प्रतिपादन हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी केले.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, तेजस्विनी सामाजिक संस्था वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वरोग निदान शिबिर तथा आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी दिलीप वाल्हेकर बोलत होते.

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. आरोग्य शिबिराचे उद्घाटन  मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी वाघोलीचे माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे हवेली, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील (गवळी), हवेली तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती सपना वाल्हेकर,  हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पश्चिम महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला संघटक भारती शेवाळे, हवेली तालुका माजी पंचायत समिती सदस्य  माणिकराव सातव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कमलाकर सातव पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, माजी उपसरपंच मंदाताई जाधवराव, तेजस्विनी संस्थेच्या अध्यक्षा सारिका  पवार, माजी उपसरपंच समीर भाडळे, महेंद्र भाडळे, कैलास  सातव पाटील, संतोष सातव पाटील, राजेंद्र भाडळे, बाळासाहेब सातव सर,  ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रेय कटके, किसन महाराज जाधव, बाळासाहेब शिंदे, विठ्ठल शिवरकर, चंद्रकांत निरगुडे, वसंत काळे, रामदास सातव, पप्पू दळवी, गणेश सातव पाटील, सोपान गोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे,प्रमोद भाडळे,लखन भाडळे, सागर जाधव, संतोष तांबे, आकाश सातव, अनिकेत सातव, ओंकार सातव, प्रतीक तांबे, रतिकांत तांबे, किरण पवार, सुजित शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.