पुणे – भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त देहू गाव येथील वृद्धाश्रमातील 30 वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच करोना किट, प्रथमोपचार किट व जीवन आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी मावळचे भाजयुमो तालुका अध्यक्ष अनिरुद्ध काळोखे, प्रा. डॉ. रविंद्र खेडकर, डॉ. अभय थोटे सर, संभाजी टिळेकर, रुपेश सोनवणे, प्रा. विकास कंद सर, भागवत नाना खेडकर, सचिन काळोखे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते वैभव सुभाष राख यांनी केले होते.