शिक्षा हा उपाय नाही (भाग 2)

-मानसी चांदोरीकर

ओंकारला घेऊन त्याच्या वर्गशिक्षिका भेटायला आल्या. त्या ओंकारवर खूप वैतागल्या होत्या. त्यांनी ओंकारला बाहेर उभं केलं आणि त्या एकट्याच आत आल्या. या मुलानी मला खूप वैताग आणलाय. वर्गात नुसता दंगा करतो. एका जागी अजिबात बसत नाही. सारखा जागा बदलतो. वर्गात मुलांना त्रास देतो. शिकवण्याकडे याचं अजिबात लक्षच नसतं. सगळ्या शिक्षक-शिक्षिका याची तक्रार करतात.

त्याच्या घरी तो आई-बाबा, आजी-आजोबा असे 5 सदस्य राहात होते. ओंकारला आजी-आजोबा खूप आवडायचे कारण ते दोघे त्याचे लाड करायचे. त्याचा अभ्यास घ्यायचे. गोष्ट सांगायचे. आजी-आजोबांबरोबर वेळ घालवणे त्याला खूपच आवडायचे पण आई-बाबा विशेषकरून बाबा त्याला मुळीच आवडत नव्हते. बाबा त्याला रोज ओरडायचे. सारखे चूक झाली की जोरात मारायचे, शिक्षा करायचे. आजी-आजोबा त्यांना समजवायला गेले तर बाबा त्यांच्यावरही चिडायचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मी रोज शाळेचा अभ्यास पूर्ण करून मग आजोबांबरोबर स्वीमिंगच्या क्‍लासला जायचो. मला खूप आवडतं पोहायला आणि क्रिकेट खेळायला. पण मी अजून खूप अभ्यास करावा म्हणून त्यांनी माझा स्वीमिंगचा क्‍लास बंद केला. ते मला मित्रांबरोबर पण क्रिकेट खेळायला जाऊ देत नाहीत. माझं क्रिकेटचं सामान त्यांनी कपाटावर उंच ठेवून दिलं. मी सांगितलं त्यांना की मी करेन अभ्यास छान पण त्यांनी नाही ऐकलं. मला खूप मारलं. आता रोज माझा अभ्यास ते घेतात. चुकलं की धपाटे देतात. आजोबा कसं छान समजावतात. तसं बाबांना नाही येत. मला नाही आवडत त्यांनी अभ्यास घेतलेला. मला बाबांचं नाही आवडत.ओंकारने अगदी निरागसपणे त्याच्या भावना मांडून टाकल्या.

त्याच्याशी हे बोलणं झाल्यावर त्याच्या आई-वडिलांना ताबडतोब भेटीसाठी बोलावले. त्याचे वडील खरोखरच तापट आणि अभ्यास या विषयाबाबत नको इतके आग्रही होते. हे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले. त्यामुळे त्यांचा स्वभाव, वर्तन याचा ओंकारच्या मनावर, वर्तनावर काय परिणाम होतो हे त्यांना सांगणे अतिशय आवश्‍यक होते. ओंकारने सांगितलेल्या मुद्यांचा संदर्भ घेऊन जेव्हा आई-वडिलांशी संवाद साधला गेला तेव्हा त्यांना काही प्रमाणात त्यांची चूक उमगली. पण वडील हे मान्य करण्यास तयारच नव्हते. त्यासाठी पुढची दोन-तीन सत्रे त्यांच्याशी संवाद साधावा लागला.

या संवादात दिलेली उदाहरणे, ओंकारवर याचा होणारा नकारात्मक परिणाम याबाबत संवाद साधल्यावर वडिलांना समस्येची तीव्रता लक्षात आली व त्यांनी स्वतःहून बदलाची तयारी दाखवली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ओंकारचे स्वीमिंग, क्रिकेट पुन्हा सुरू केले. त्याबाबत सोपे पण महत्त्वाचे नियम त्यांनी ओंकारला सांगितले. त्यामुळे ओंकार खूपच खूष झाला.

दोन्ही गोष्टी पुन्हा करायला मिळाल्याने तो खूपच आनंदला. त्याच्यावरची अतिरेकी बंधने दूर झाल्याने व वडिलांचा स्वभाव थोडा थोडा बदलल्याने त्याची अभ्यास न करणे ही समस्या आपोआपच दूर झाली. त्याउलट पुढच्या चाचणी परीक्षेत त्याने आधीपेक्षा उत्तम मार्क मिळवले. त्यामुळे आई-बाबाही खूप आनंदले. (केसमधील नावे बदलली आहेत.)

शिक्षा हा उपाय नाही (भाग 1)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)