शिक्षा हा उपाय नाही (भाग 1)

-मानसी चांदोरीकर

ओंकारला घेऊन त्याच्या वर्गशिक्षिका भेटायला आल्या. त्या ओंकारवर खूप वैतागल्या होत्या. त्यांनी ओंकारला बाहेर उभं केलं आणि त्या एकट्याच आत आल्या. या मुलानी मला खूप वैताग आणलाय. वर्गात नुसता दंगा करतो. एका जागी अजिबात बसत नाही. सारखा जागा बदलतो. वर्गात मुलांना त्रास देतो. शिकवण्याकडे याचं अजिबात लक्षच नसतं. सगळ्या शिक्षक-शिक्षिका याची तक्रार करतात.

माझ्याकडे खूप समजावलं मी त्याला दोन-तीन वेळा शिक्षा पण केली. पण कशाचा काही उपयोग झाला नाही. मी फार वैतागलीये. याच्या पालकांनाही बोलावलं भेटायला तर त्यांनी तर कहरच केला. तो अभ्यास का करत नाही हे तुम्हीच शोधलं पाहिजे असं म्हणाले त्याचे वडील. आणि मला दुसऱ्या दिवशी कळलं की ज्या दिवशी ते शाळेत आले होते. त्याच दिवशी संध्याकाळी त्याच्या वडिलांनी त्याला घरी खूप मारलं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या दिवशी बिचारा एवढंसं तोंड करून आला होता. काय करावं? याला कसं समजवावं मला कळेनासं झालं म्हणून त्याला इथे घेऊन आले. आता पण वर्गात नुसता दंगा करत होता. एवढं बोलून त्या थांबल्या. ओंकारला आत बोलावलं आणि त्या वर्गावर जाण्यासाठी निघून गेल्या.

ओंकार आल्यावर त्याला बसायला सांगून त्याच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. ओंकार खूपच बोलका मुलगा होता. या सत्रात त्याने खूप गप्पा मारल्या. विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची अगदी छान उत्तरं दिली आणि जाता-जाता समस्येचा अंदाज येईल असं एक वाक्‍यही बोलला माझे आई-बाबा ना मला अजिबात आवडत नाहीत. त्याच्या याच वाक्‍यावरून समस्येचे मूळ कारण समजले. शिक्षिकांच्या बोलण्यातही वडिलांनी त्याला मारले हे आलेच होते. त्यामुळे समस्येचे मूळ कारण कौटुंबिक पार्श्‍वभूमीतच असावी हे लक्षात आले. त्याला पुढच्यावेळी भेटण्यासाठी बोलावून या सत्रात त्याला वर्गात पाठवले.

पुढच्या एक-दोन दिवसात त्याच्या वर्गशिक्षिकांना भेटून त्यांच्या भेटीत पालक कसे बोलले, वागले ते जाणून घेतले. शिक्षिकांनीही त्याचे पालक खूप कडक बोलणारे वागणारे होते असेच सांगितले. विशेष करून ओंकारच्या वडिलांचा स्वभाव खूपच तापट असावा असे त्यांचे मत होते. ते ओंकारशी घरी खूप कडक वागत असावेत, असा त्यांचा अंदाज होता. शिक्षिकांशी संवाद साधून झाल्यावर ओंकारला पुन्हा भेटायला बोलावले व त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली.

शिक्षा हा उपाय नाही (भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)