पुणे – आपल्या देशत अगदी पूर्वीच्या काळापासून आपण गुळाचा वापर करत होतो. मात्र आलिकडील काही वर्षांमध्ये गुळापेक्षा साखर वापरण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. त्यामुळे अनेक रोग आपल्या जीवनात प्रवेश करुन आपले जीवन रोगग्रस्त करत आहे. तर आज आम्ही तुम्हाला गुळाचे फायदे सांगणार आहोत.
उसाचा रस आटवून त्यापासून गुळ तयार केला जातो. गूळ तयार करताना उसामध्ये असणारी विविध पोषकतत्वे, खनिजे, क्षार व व्हिटॅमिन्स गुळामध्ये टिकून राहतात. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज ही पोषकघटक मुबलक असून यात व्हिटॅमिन-B, कॅल्शिअम, जस्त, फॉस्फरस व तांबे यासारखी महत्वाचे घटकही असतात.
गुळामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो – रक्तदाब नियंत्रणातसाठी गूळ प्रभावी ठरतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस आढळते. तसेच तुम्ही गुळाबरोबर आले सेवन केल्यास सांधेदुखीपासून लवकर मुक्ती मिळते.
हिमोग्लोबिन वाढवते – भारतीय स्त्रियांमध्ये ऍनिमिया चे प्रमाण खूप मोठ्या संख्येने आढळते. आहारात योग्य प्रमाणात लोहाचा समावेस नसेल तर शरीरात लोह कमतरता निर्माण होते व ऍनिमिया सारखे आजार होतात. ऍनिमिया दूर करण्यासाठी गुळ खाणे फायदेशीर असते. 100 ग्रॅम गुळामध्ये 11 mg लोहाचे असते.
स्त्रियांसाठी उपयुक्त – सर्वच वयोगटातील स्त्रियांसाठी गुळ खाणे उपयुक्त आहे. अयोग्य आहार व मासिक पाळी या कारणांमुळे स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी आढळते. यासाठी वयात येणाऱ्या मुली, मासिक पाळी असणाऱ्या स्त्रियांनी गुळाचा आहारात जरूर समावेश करावा. गरोदरपणातही लोहाचे खूप महत्त्व असते.
वजन कमी करते – तुम्ही जर लठ्ठपणाने त्रासलेले आहात तर, तुम्ही दुधासोबत गुळाचे सेवन चालू करा. कॅल्शिअमयुक्त दुधासोबत पोटॅशिअमयुक्त गुळ तुम्हांला सडपातळ आणि स्लिम बनवेल. दुधासोबत गुळाचा सर्वात हेल्थी फायदा घेण्यासाठी हे सेवन नियमित घेत जा.
शरीराला मिळते ताकद – गुळाच्या नियमित सेवनाने शरीर ताकदवान होते. तसेच, दिवसभराचा थकवा दूर होण्यासही मोठी मदत होते. आणि तुमच्या शरीरात ऊर्जा पातळी कामय राहते आणि ती कमी होत नाही.