बहुगुणी शतावरीचे आरोग्यदायी फायदे

शतावरीची लागवड सर्वत्र होते. भारतात मिळणारी शतावरी फक्‍त औषधात वापरता येते. मात्र, पाश्‍चिमात्य देशात उगवणारी शतावरी चवीला गोड असते व आहारात वापरली जाते.

शतावरीची वेलीच्या दांड्यावर जमिनीच्या दिशेने वळलेले काटे असतात. शतावरीला लहान, सुगंधी पांढरी किंवा गुलाबी छटा असलेली फुले असतात. खोडापासून खाली जाड, पांढऱ्या रंगाच्या अनेक मुळ्या निघतात. या मुळ्या औषधी असतात.

शतावरी चवीला गोड, कडू, वीर्याने शीत व विपाकाने मधुर असते. शतावरी पित्तदोषाचे शमन करते, मेधा, आकलनशक्‍ती वाढवते, अग्निवर्धन करते, डोळ्यांसाठी हितकर असते, शुक्रधातूचे पोषण करते, स्तन्यप्रवृत्तीस मदत करते, ताकद वाढवते. गुल्म, अतिसार, सूज यावरही शतावरी उपयुक्‍त असते.
शतावरी वातशामक व ताकद वाढवणारी असल्याने शतावरीने सिद्ध केलेले तेल वातव्याधींवर वापरतात. या तेलाच्या नियमित अभ्यंगाने अशक्‍तपणा दूर होतो, वजन कमी असल्यास वाढते.

शतावरी मेंदूची ताकद वाढवणारी आणि मेधा, बुद्धी व स्मृतिवर्धक असल्याने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, डोक्‍यावर ताण असणाऱ्या एक्‍झिक्‍युटिव्हस्‌, मॅनेजर अशा उच्च पदावर असणाऱ्या व्यक्‍तिंसाठी उपयुक्‍त असते.
दिवसभराच्या धावपळीसाठी शरीराला जी ऊर्जा लागते, ती शतावरी कल्पाच्या सेवनाने मिळते. शतावरीच्या गुरू, स्निग्ध गुणांमुळे व मधुर रसामुळे बल्य काम होते.
अशक्‍त व्यक्‍तींनी वजन वाढवण्यासाठी शतावरी कल्प नियमित घ्यावा. शतावरीच्या कडू रसाने भूक वाढते. सततची चिंता, काळजी कुपोषण यामुळे येणारी शारीरिक दुर्बलता व मानसिक अवसाद शतावरी कल्पाच्या सेवनाने कमी होतो.

शतावरी कल्पाने डोळ्यांचे आरोग्य सुधारते. अम्लपित्तामध्ये, पित्त कमी होते. तसेच जठर अथवा आतड्यात व्रण असल्यास तो भरून येतो.
जुलाबामुळे येणारा अशक्‍तपणा शतावरी कल्पाने कमी होते. शतावरी कल्प पाण्यात विरघळवून थोडे थोडे प्यायल्यास जुलाब थांबातात.
शतावरी कल्प स्त्रियांसाठी वैशिष्ट्यपूर्ण काम करतोविशेषतः मांसधातूवर कार्य करतो. त्यामुळे गर्भाशयासारख्या मांसल अवयवांवर याचे विशेष कार्य होते. त्यामुळे लहान किंवा वयात येणाऱ्या मुलींसाठी सर्वांग पोषणासह, गर्भाची योग्य वाढ होण्यास मदत होते.

मासिक पाळीच्या वेळी होणारी कंबरदुखी, गळून जाणे, थकवा, चिडचिड इ. त्रास शतावरी कल्पामुळे कमी होतो. गर्भावस्थेत स्त्रीचे व गर्भाचे पोषण उत्तम होते. बाळाचे वजन वाढायला मदत होते व पुढे मातेला जे स्तनपान बाळाला द्यायचे असते त्याची शरीरात तयारी सुरू होते. सुतिकावस्थेत उत्तम स्तन्य येण्यास मदत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.