आरोग्य आणि कॉस्मेटिक्‍स

अनावश्‍यक महागडी सौंदर्यप्रसाधने विकत घेण्याआधी ती त्वचेसाठी योग्य आहेत की नाही हे पाहणे अत्यंत आवश्‍यक आहे. कुठलेही प्रसाधन, मग ते क्रीम असो, क्‍लिंसनर अथवा मॉईच्यरायझर असो. तेव्हा बाजारात मिळणाऱ्या शेकडो प्रसाधनांतून आपल्या त्वचेला योग्य वस्तू कशी निवडाल? ही एक सोपी गोष्ट आहे. त्यासाठी आपल्या तळहातांच्या मागच्या बाजूस एक थेंब प्रसाधन घेऊन ते हळुवार पसरवावे. त्यानंतर लगेच ते कापसाने टिपून टाकावे. त्वचेवर तेलकटपणा आढळल्यास ते प्रसाधन वॉटर इन ऑईल आहे. त्वचेवर तेलकटपणा न आढळल्यास ते प्रसाधन वॉटर इन वॉटर आहे. समतोल प्रसाधनात मात्र त्वचा मऊ आणि चमकदार आढळते. आपल्या सभोवतालच्या वातावरणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतच असतो. बंदिस्त कार्यालयात (इनडोअर) काम करणाऱ्या स्त्रीच्या त्वचेच्या तक्रारी या फिरतीची नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या त्वचेच्या तक्रारींपेक्षा वेगळ्या असतात.

एसीमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या स्त्रियांची त्वचा ही कोरडेपणाकडे अधिक वळते, तर फिरतीच्या नोकरीवर असणाऱ्या स्त्रियांची त्वचा ही तेलकटपणाकडे जास्त वळते. त्वचेवर काळपट तपकिरी डाग उठणे, पिंपल्स येणे, वेगवेगळी त्वचेची इन्फेक्‍शन्स या तक्रारीही जास्त प्रमाणात आढळतात. सूर्यकिरणातील अल्ट्राव्हायोलेट किरणांचा बाहेर फिरणाऱ्या स्त्रियांच्या त्वचेवर दुष्परिणाम होतो. त्वचेचा काळपटपणा टिकून राहतो. त्यावर खाज येणे, लालसर होणे, खपल्या होणे अथवा पुरळ आल्यास डॉक्‍टरांकडे जाणे आवश्‍यक आहे. ती अल्ट्‍राव्हायोलेट ऍलर्जी असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नये. सुरकुत्या अकाली येण्याचे प्रमाण हे कोरडया त्वचेमध्ये जास्त असते. त्या तेलकट त्वचेमध्ये उशिरा, पण जास्त खोल होतात. आपल्या रोजच्या दिनचर्येतील काम करताना जर आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकलो तर वरील सर्व प्रॉब्लेम टाळू शकतो. त्यासाठी वेगळा वेळ काढण्याची आवश्‍यकता नाही. स्वयंपाक करता करता तिथल्याच काही वस्तूंचा वापर करूया.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यालयीन स्त्रियांसाठी..
– रोज क्‍लिंसिंग करणे अत्यावश्‍यक आहे.
– संध्याकाळी घरी आल्यावर गार दूध ओल्या कापसावर घेऊन चेहरा मानेपासून 4-5 वेळा पुसणे.
– दूध व काकडीची पेस्ट तयार करून गॅसवर 5-10 मिनिटे ठेवावी. त्यात 3-4 थेंब टिंक्‍चर बेन्झोइन घालावे. फ्रीजमध्ये ठेवल्यास चेहरा पुसण्यास एक आठवडा वापरता येते.
– चेहरा दर 4 तासांनी फक्त गार पाण्याने धुवावा.

फिरतीची नोकरी करणाऱ्या स्त्रियांसाठी..
– उटणे पाण्यात भिजवून चेहरा धुवा.
– जेलबेस फेसवॉश वापरू शकता.
– एक चमचा दही + 4 थेंब लिंबाचा रस याने चेहरा पुसावा, त्वचा कोरडी असल्यास 3-4 थेंब घालावेत. झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या 1 कप पाण्यामध्ये 10 मिनिटे उकळा. गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवल्यास 4-5 दिवस वापरता येऊ शकते. चेहरा दर 4-5 तासांनी फक्त गार पाण्याने धुवावा. साबणामध्ये अल्कलीनिटी जास्त असते व त्वचेवर असलेले संरक्षणार्थ ऍसिड मॅंटल साबण धुऊन टाकतो. त्यामुळे कोरडेपणा खूप अधिक प्रमाणात वाढतो.

– श्रुती कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)