अौषधी बगीचा : जास्वंद

– सुजाता गानू

जास्वंदीच्या फुलांचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. ही जास्वंद लाल, पिवळी, पांढरी, केशरी, गुलाबी अशा
फुलांनी बहरते तेव्हा सारेच मंत्रमुग्ध होतात. प्रत्यक्ष श्रीगणेशाला तांबड्या जास्वंदीची भूल पडली असे पुराणात म्हटले आहे. या जास्वंदीचे औषधी उपयोग अनेक आहेत. ते असे..

स्त्रियांच्या इतर आजारावर तसेच पाळीच्या त्रासावर व वारंवार होणाऱ्या गर्भपातावर हे प्रदरावर म्हणजेच बायकांचे अंगावर पांढरे जाते त्यावर फार उपयुक्‍त आहे. पांढऱ्या जास्वंदीचे चूर्ण पोटात घेतात. पांढऱ्या जास्वंदीच्या लहानशा पाच कळ्या आणून त्या साजूक तुपात तळून त्यात साखर घालून शिरा करून, रोज एक वेळ खावा, यामुळे धुपणी बरी होते. ज्या स्त्रियांना गर्भस्राव होण्याची म्हणजेच 2-3 महिने झाले असता धुपण्याची खोड असले, त्यांनी वरीलप्रमाणे पांढऱ्या जास्वंदीच्या फुलांचा किंवा कळ्यांचा शिरा करून, दुसऱ्या महिन्यापासून 2 महिने सारखा रोज खावा; म्हणजे गर्भ टिकतो गर्भपात होत नाही. गर्भ पडत नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केसांच्या वाढीसाठी

जास्वंद केसांचे मोठे औषध आहे. जास्वंदीच्या
फुलांचा रस काढून केसास लावला असता केसांची चांगली वाढ होते तसेच पांढरे केसांचे प्रमाण कमी होते.

चाईवर

डोक्‍यास चाई लागते अगर टक्‍कल पडते त्यावर जास्वंदीच्या फुलांचा किंवा पानांचा रस नेमाने खोबरेल तेलातून चोळीत गेल्यास केस येतात.
केशवृद्धीसाठी जास्वंदीचे उपयुक्‍त तेल – जास्वंदीच्या पानांचा किंवा फुलांचा रस काढावा. त्यात तितकेच खोबऱ्याचे तेल घालावे व मंदाग्नीवर रस आटेपर्यंत कढवावे. मग खाली उतरून त्यात वाळा, नागरमोथा, जटामांसी, तगर वगैरे सुगंधित द्रव्ये घालून तेल ठेवावे. तेल डोक्‍यावर घातल्याने थंडावा येतो.जास्वंदीचे तेल डोके शांत ठेवण्यासही मदत करते. शरीराच्या अवयवांना तसेच डोक्‍याला मसाज केला असता शांत वाटते.

निद्रानाशावर

ज्यांना झोप येत नाही त्यांनी जास्वंदीचे फूल डोक्‍यावर ठेवून झोपावे. नक्‍कीच लगेच झोप लागते. जास्वंदीच्या पानांचा काढा एक चमचा पोटात घेतला तरी निद्रानाश जाऊ शकतो.

पोटाच्या विकारांवर

जास्वंदीचे पान खडीसाखरेत चुरडून खाल्ले असता पोटदुखी तसेच पोटाचे विकार बरे व्हायला मदत होते. मूळ, पान, फूल, खोड असे सर्वच उपयुक्‍त आहे.
पिवळी, गुलाबी, लाल, पांढरी, केशरी अशा विविध जास्वंदीच्या रंगाची फुले असली तरी सर्वांमध्ये औषधी गुण आहेत.म्हणूनच श्री गणेशाला गर्द लाल जास्वंदीचे फुल अत्यंत प्रिय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)