लाहोर -पाकिस्तानच्या लाहोरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोमवारी एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापिका सलमा तनवीरला इशनिंदेच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली. शिवाय तिला 5000 पाकिस्तानी रुपये दंडही ठोठावला. तन्वीर यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आणि त्यांना इस्लामचा प्रेषित मानले नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
पोलिसांनी 2013 मध्ये एका स्थानिक मौलवीच्या तक्रारीवरून तन्वीर यांच्याविरोधात ईशनिंदा केल्याचा गुन्हा दाखल केला होता. प्रेषित मोहम्मद यांना त्या इस्लामचा शेवटचा पैगंबर मानत नाही आणि स्वतःला इस्लामचा पैगंबर असल्याचा दावा करत असा आरोप या मौलवीने केला होता.
वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या पंजाब इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थच्या वैद्यकीय मंडळाच्या अहवालात म्हटले आहे की, संशयिताची मानसिक स्थिती पूर्णपणे सुदृढ असल्याने ती शिक्षेसाठी आहे. अत्यंत कठोर असलेल्या कायद्यांतर्गत पाकिस्तानमध्ये आतापर्यंत किमान 1472 लोकांवर इशनिंदेचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1987 पासून हा कायदा अस्तित्त्वात आहे. ईश्वरनिंदा प्रकरणातील आरोपींची केस घ्यायला सहसा कुणी तयार होत नाही. त्यामुळे त्यांना आवडीच्या लायक वकीलच मिळत नाहीत. शिवाय, मिळालेले वकीलही या प्रकरणांमधून काढता पाय घेण्याच्याच तयारीत असतात.