घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. पैठणकर निलंबित

महापालिकेचे प्रभारी आयुक्त द्विवेदी यांची तडकाफडकी कारवाई

कर्तव्यात कसूर करणाऱ्यावर कारवाई करणार : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी

पावसाळा तोंडावर आला असून, नैसर्गिक आपत्तीची पूर्व तयारी संबंधित विभागांना ठरवून दिलेली कामे वेळेत करावी. महानगरपालिका असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी असो, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी सांगितले आहे.

नगर – घनकचरा व्यवस्थापन प्रमुख तथा आरोग्याधिकारी डॉ. एन. एस. पैठणकर यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. महापालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ही कारवाई केली. मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील नाले सफाई झाली असल्याची चुकीची माहिती पैठणकर यांनी दिली असल्याचे बोलले जात आहे.

घनकचरा व्यवस्थापकांच्या निष्काळजीपणामुळेच शहरात कचर्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शहरातील घनकचरा संकलन, अनेक महिन्यांपासून रखडलेल्या निविदा प्रक्रिया, राष्ट्रीय हरित लवादाकडे सुरू असलेल्या सुनावणीला गैरहजर राहणे, स्वच्छ भारत अभियानात शहराचे घसरलेले रॅकिंग, शौचालयांची प्रलंबित कामे, प्लॅस्टिक वापरावर न होणारी कारवाई, प्लॅस्टिकच्या विल्हेवाटीसाठी अपेक्षित आराखडा सादर न केल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आयुक्तांना बजावण्यात आलेली कारवाईची नोटीस, घनकचरा व्यवस्थापन विभागाचा ढिसाळ कारभार आणि दोन दिवसांपूर्वी कचरा डेपोला लागलेली आग अशा विविध कारणामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मागील आठवड्यात महानगरपालिकेत नालेसफाईबाबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पैठणकर यांनी चुकीची माहिती दिली होती. त्याची चौकशी करून तसेच आनखी काही कारमानुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.