नवी दिल्ली : इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सिवन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे तामिळनाडू सरकारने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. गुरूवारी स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर सिवन यांना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
विज्ञान क्षेत्रातील प्रगती, तसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्काराने गौरवण्यात येते. तामिळनाडू सरकारच्यावतीने तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.