पोटच्या मुलीचे शीर हातात घेऊन तो’ फिरत होता रस्त्यावर…;चौकशीतून धक्कादायक माहिती आली समोर

नवी दिल्ली : आई वडील आपल्या पोटच्या लेकराला जपण्यासाठी जीवाचं रान करतात.पण उत्तर प्रदेशात एका वडिलांनी आपल्याच तरुण मुलीचा खून करून तिचेच शीर हातात घेऊन रस्त्याने फिरत असताना पाहायला मिळाले. हरदोई जिल्ह्यातील गावात या घटनेने खळबळ उडाली होती.

आपल्या १७ वर्षाच्या मुलीचे शीर घेऊन अत्यंत शांतपणे हा व्यक्ती रस्त्यावरुन चालत निघाला होता. समोरचे ते चित्र पाहून घाबरलेल्या गावकऱ्यांना नेमकं काय करावं सुचत नव्हते. यावेळी त्यांच्यातील एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दोन अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता यामधील एकाने मोबाइलवर हा सगळा प्रकार रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यांनी त्याला नाव, गाव तसंच शीर कोणाचे आहे असे अनेक प्रश्न विचारले. आरोपी सर्वेशदेखील सर्व प्रश्नांची शांतपणे उत्तर देत होता. व्हिडीओत त्याने हे शीर आपल्या १७ वर्षाच्या मुलीचे असून तिचे एका व्यक्तीशी संबंध असल्यानेच आपण हत्या केल्याची कबुली दिली आहे.

“मीच केलं आहे, तिथे अन्य कोणी नव्हतं. मीच कडी लावली आणि हत्या केली. मृतदेह रुममध्येच आहे,” असे आरोपी वडील सांगताना दिसत आहे. यावेळी पोलीस त्याला हातातील शीर खाली ठेवून रस्त्याच्या कडेला बसण्यास सांगतात. यावेळीही आरोपी कोणता विरोध करत नाही. आरोपी सर्वैशला पोलीस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.