नवी दिल्ली : करोनामुळे देशभरात सरकारकडून लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यातच सुरुवातीपासून काँग्रेस भाजपाविरोधात आक्रमक होताना दिसत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसत होते. त्याचबरोबर आता काँग्रेसचे नेतेही मोदी सरकारवर टीका करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख न करता काँग्रेसने पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.
वो भी शामिल था, 'बहार-ए-वतन' की लूट में,
फक़ीर बन के आया था वो, लाखों के सूट में ।
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) July 28, 2020
राजस्थानातील राजकीय संघर्षानंतर काँग्रेसने भाजपाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींसह भाजपावर टीका करताना दिसत असून, काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते राजीव सातव यांनी एक शेर ट्विट करून पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
वो भी शामिल था, ‘बहार-ए-वतन’ की लूट में,
फक़ीर बन के आया था वो, लाखों के सूट में ।
हा शेर ट्विट करून राजीव सातव यांनी मोदींवर टीका केली आहे. लाखो रुपयाच्या सूटमध्ये फकीर म्हणून आलेली व्यक्तीही देशाला लुटण्यामध्ये सहभागी होती, असा या शेरचा अर्थ असून, सातव यांनी यातून अप्रत्यक्षपणे मोदींवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही राजीव सातव यांनी मोदींवर चीनच्या मुद्यावरून टीका केली होती. “चीनसोबतच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन अंचबित करणार आहे. मोदीजी, ही मन की बात नसेल पण देशाची बात आहे. तुम्ही देशासमोर सत्य आणले पाहिजे. मोदीजी, भारताच्या सीमेवर काय होत आहे, हे सगळं देशासमोर आणा,” असे राजीव सातव यांनी ट्विट करून म्हणाले होते.