पोलीस ठाण्यात दुचाकी तरीही घेतली हरविल्याची तक्रार

पिंपरी – बंद पडलेली दुचाकी एका नागरिक रस्त्याच्याकडेला पार्क करून मॅकेनिकला आणण्यासाठी गेले. दरम्यानच्या काळात ती दुचाकी बेवारस समजून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी ती उचलून नेली.

दुचाकी हरविल्याची तक्रार देण्यासाठी गेले असता त्यांना चार ते पाच पोलीस ठाण्यात जाऊन दुचाकी पाहण्यास सांगितले. त्यानंतर दुचाकी ठाण्यातच असताना हरविल्याची तक्रार पोलिसांनी घेतली.
दुचाकी पोलीस ठाण्यातच असून तुम्ही ती कोर्टातून सोडवून घ्या, असा सल्ला पोलिसांनी दिला.

एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या या भोंगळ कारभाराचा वाहन मालकाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. एचडीएफसी कॉलनी, चिंचवड येथे राहणाऱ्या श्रद्धा रवींद्र कुदळे यांची दुचाकी 7 सप्टेंबर रोजी काही कामानिमित्त त्यांचे पती घेऊन गेले. या दुचाकीचे चाक जाम झाल्याने त्यांनी ती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला पार्क करून ते मॅकेनिकला आणण्यासाठी गेले. दरम्यानच्या काळात दुचाकी एमआयडीसी पोलिसांनी उचलून आणली. दुचाकी हरविल्याची तक्रार देण्यासाठी श्रद्धा यांचे पती एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले असता तेथील पोलिसांनी त्यांना तळवडे, निगडी, पिंपरी, भोसरी येथील वाहतूक शाखेत बघण्यास सांगितले.

चार दिवसांनंतर अखेर तक्रार घेतली. दुचाकीची तक्रार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यातून कर्मचाऱ्याचा फोन आला. तुमची दुचाकी पोलीस ठाण्यात असून ती कोर्टाकडून सोडवून घ्या, असा सल्ला दिला. याबाबत कुदळे यांनी पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.