fbpx

दुचाकीला बांधून कुत्र्याला जिवे मारले

पिंपरी – “लॉकडाऊन’च्या काळात काही प्राणीप्रेमी नागरिक भटक्‍या कुत्र्यांना खायला देत आहेत. अशा भीषण परिस्थितीतही काही निर्दयी लोक उपासमार होत असलेल्या कुत्र्यांना खूपच दुष्टपणे मारत असल्याचे समोर आले आहे.

कासारवाडी येथे एका तरुणाने भटक्‍या कुत्र्याच्या गळ्यात दोरी अडकवून त्यास दुचाकीस बांधून लांबपर्यंत फरपटत नेले. यामुळे या कुत्र्याचा मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी येथे मंगळवारी (दि. 5) रात्री घडली. या प्रकरणी एका प्राणीप्रेमी तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बंटी फुगे (वय 25, रा. कासारवाडी) या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. हिना सलीम नायकुडे (वय 27, रा. पिंपळे सौदागर) यांनी बुधवारी (दि. 6) याबाबत भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास आरोपी बंटी फुगे याने कुत्र्याच्या गळ्यात नायलॉन दोरी बांधली. त्यास दुचाकीच्या पाठीमागे बांधून स्मशानभूमीपासून ते किनारा हॉटेलपर्यंत फरफटत नेऊन ठार मारले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.