नवी दिल्ली – अयोध्या भूमिवादातील एक वादी असणारे इक्बाल अन्सारी यांना राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमाचे पहिले औपचारिक निमंत्रण सोमवारी मिळाले.
मला पहिले आमंत्रण मिळावे, ही प्रभू रामचंद्राची इच्छा असावी अशी माझी श्रध्दा आहे. ते मी स्वीकारले आहे, असे अन्सारी यांनी सद्गतीत होऊन सांगितले. सोनेरी पार्श्वभूमी असणारे हे निमंत्रण पत्र न्यासाने बनवले आहे.
या निमंत्रणपत्रानुसार व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महंत नृत्य गोपालदास उपस्थित राहणार आहेत. या शिवाय निमंत्रणावर रामलल्लाचे छायाचित्रही आहे.
राममंदिराच्या भव्य भूमिपूजन सोहोळ्याला दोनशेहून अधिक अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.