पाठिंबा मिळाल्याचा आव आणला, तरीही असमर्थ ठरले – मुनगंटीवार

मुंबई: काही पक्षांनी पाठिंबा मिळाल्याचा आव आणला तरीही असमर्थ ठरले असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने जनतेने दिलेल्या जनादेशाचा अनादर झाला असून योग्य क्षणी आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु असंही ते म्हणाले. कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

राज्यावर अस्मानी संकट असताना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. या गोष्टीला काही लोकांचा हट्ट कारणीभूत ठरला आहे.शेतकऱ्यांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. भाजप अजूनही “वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.