वडूज- सातारा जिल्ह्यातील वडूज शहरातील स्टेट बॅंकेच्या शेजारील इंडियन ऑइल कंपनीचा पेट्रोल पंपावर खुलेपणाने पेट्रोलची विक्री चालू असल्याचे डिजीटल प्रभात’ने दि. 30 रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत येथील शहा पंपावर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
वडूज येथील पंपावर पेट्रोल व डिझेल खरेदीसाठी परिसरातील दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठी गर्दी उसळली होती. शासनाने घातलेले निर्बंध झुगारून सर्रासपणे ही विक्री केली जात होती. यावेळी पंपावर एवढी गर्दी होती की दुहेरी रांगा करूनही पंपाच्या बाहेर मुख्य रस्त्यावर मोठीच्या मोठी रांग पेट्रोल भरून घेण्यासाठी लागलेली होती.
दरम्यान, याबात डिजीटल प्रभात,वर घटनेच्या व्हिडीओसह वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेत शहा पेट्रोल पंपावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.