पुणे – करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, शनिवारी म्हणजे 24 तासांत तब्बल 528 बाधितांची नोंद शहरात झाली.मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली असून, शहरात सात तर शहराबाहेरील नऊ असे एकूण 16 जणांचा मृत्यू 24 तासात झाला आहे.
बाधितांची संख्या काही दिवसांपासून दिवसाला चारशेपेक्षा जास्त होता. मात्र शनिवारी पाचशेपेक्षा जास्त बाधितांची नोंद करण्यात आली आहे. या बाधितांचा समावेश करून एकूण बाधितांची संख्या 1 लाख 69 हजार 394 झाला आहे. दिवसभरात 415, तर आतापर्यंत एकूण 1 लाख 59 हजार 429 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
क्रिटिकल रुग्णसंख्याही अद्याप 400 च्या जवळपासच असून, शनिवारी 400 क्रिटिकल आणि 248 रुग्ण व्हेन्टिलेटरवर उपचार घेत आहेत. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 5507 असून, मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 4,558 आहे. दिवसभरात केलेल्या नमुन्यांची तपासणी 4535 आहे.