मुंबई – अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट रिलीज होण्यास आता फारच कमी अवधी शिल्लक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्याचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रभासचे चाहते आधीच या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत आहेत.
अशात, त्याची संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाला सुपरहिट करण्यासाठी जोरदार प्रमोशन करत आहे. आता अलीकडेच दक्षिण अभिनेत्री कस्तुरी शंकर हिने देखील चित्रपटात भगवान रामची भूमिका केल्याबद्दल निर्मात्यांना फटकारले आणि त्याच्या चेहऱ्यावर केस का आहेत असा सवाल केला. यावरून प्रभासच्या चाहत्यांनी या चित्रपटाबाबत कस्तुरीलाच फाटकराले आहे.
‘आदिपुरुष’ रिलीज होण्याआधीच सोशल मीडियावर या चित्रपटाबाबत वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. काही जण संघाच्या प्रमोशनच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तर काही पात्रांच्या वागणुकीवर टोमणे मारत आहेत. आता याच प्रकारात दाक्षिणात्य अभिनेत्री कस्तुरी शंकर हिनेही चित्रपटातील रामच्या पात्राबाबत आपली भूमिका मांडली आहे, ज्यानंतर तिला सोशल मीडियावर ट्रोलचा सामना करावा लागत आहे.
साऊथ अभिनेत्री कस्तुरी शंकर हिने तिच्या इन्स्टाग्रामवर आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाविषयीचे विचार शेअर केले आहेत. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, ‘अशी परंपरा आहे का जिथे भगवान रामजी आणि लक्ष्मण यांना मिशा आणि चेहऱ्याच्या केसांनी चित्रित केले जाते? मला वाटतं प्रभास कर्णासारखा दिसतोय रामसारखा नाही.’ तिने असं म्हणत टीका केली आहे. अशात प्रभातच्या चाहत्यांनी आता कस्तुरी शंकरचीच शाळा घेतली आहे. श्रीरामाच्या संपूर्ण अवतारात त्यांच्या चेहऱ्यावर केस नव्हते, असा कोणताही स्रोत आहे का?’ असं म्हणत तिलाच चाहत्यांनी ट्रोल केले आहे.
हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये येत आहे. ‘आदिपुरुष’मध्ये प्रभासशिवाय क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग आणि देवदत्त नागे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे.