पुणे – जबरी चोरीच्या गुन्ह्यात पसार असलेला आरोपी दिवाळीला सासुरवाडीत मुक्कामी आला आणि शिवाजीनगर पोलिसांनी सापळ्यात अडकला. इरफान बाबलु शिया (वय 22, सध्या रा. पाटील इस्टेट, इराणी वस्ती, शिवाजीनगर. मूळ गुंटकल आंध्रप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
शिवाजीनगर हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे फोटो काढून तपास सुरू होता. त्यावेळी गुन्ह्यातील आरोपी सध्या पाटील इस्टेट येथे आल्याची माहिती पोलीस हवालदार बशीर सय्यद यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळाली.
त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे यांच्यासह पथकाने सापळा रचुन इरफान शिया याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.