मुंबई- हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे एचडीएफसीला रिझर्व बॅंकेने दिलेल्या सूचनांनुसार एचडीएफसीला एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स आणि एचडीएफसी ईर्गो या कंपन्यातील आपले भाग भांडवल 50 टक्के पर्यंत कमी करण्यास सांगितले आहे.
या दोन्ही कंपन्यांचे विलिनीकरण प्रक्रीयेनंतर रिझर्व बॅंकेने ही सूचना केली आहे. सध्या एचडीएफसी कडे एचडीएफसी ईर्गो हेल्थचे 52.25% तर एचडीएफसी ईर्गोचे 50.58 टक्के भाग भांडवल आहे. हा व्यवहार पुर्ण करण्यासाठी एचडीएफसीला सहा महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.
दरम्यान, एचडीएफसीकडील अतिरीक्त भाग भांडवल दीड हजार कोटी रुपयांची असल्याचे समजले जाते. ते विकल्यानंतरही एचडीएफसीचे या कंपन्यांवर नियंत्रण राहणार आहे