एचडीएफसी बॅंक, एचसीएल टेकमुळे निर्देशांकांना आधार

 

मुंबई-जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येण्याबरोबरच एचडीएफसी बॅंक आणि एचसीएल टेक या कंपन्यांच्या शेअरची मागणी वाढल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक वाढण्यास मदत झाली.

मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 122 अंकांनी म्हणजे 0.28 टक्‍क्‍यांनी वाढून 40,544 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 23 अंकांनी वाढून 11,896 वर अंकांवर बंद झाला.

आजच्या तेजीत महिंद्रा, एशियन पेंट्‌स, भारती एअरटेल या कंपन्यांनी सहभाग नोंदविला. मात्र, ओएनजीसी, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक, टाटा स्टील, स्टेट बॅंकेला विक्रीचा मारा सहन करावा लागला.

ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकन कॉंग्रेसदरम्यान आणखी पॅकेज देण्याच्या शक्‍यतेवर चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर चीनचा विकासदर वाढला असल्यामुळे जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आणखी एक पॅकेज देण्याची शक्‍यता खुली असल्याचे संकेत दिल्यामुळे भारतीय शेअरबाजारातही सकारात्मक वातावरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.