HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज महागणार, नवे दर लागू!
HDFC : खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये 8 जून, 2026 पासून सर्व मुदतींसाठी 10 बेसिस पॉईंट्सपर्यंत (1 टक्का म्हणजे 100 बेसीस पॉइंट) वाढ केली आहे.

HDFC – खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये 8 जून, 2026 पासून सर्व मुदतींसाठी 10 बेसिस पॉईंट्सपर्यंत (1 टक्का म्हणजे 100 बेसीस पॉइंट) वाढ केली आहे.
सर्वात जास्त 10 बेसिस पॉईंट्सची वाढ दोन वर्षांच्या मुदतीच्या कर्जांसाठी करण्यात आली असून, हा दर पूर्वीच्या 8.45 टक्क्यांवरून 8.55 टक्के करण्यात आला आहे. बेंचमार्क एक-वर्षीय एमसीएलआरमध्ये 5 बेसिस पॉईंट्सची वाढ करून तो 8.40 टक्के करण्यात आला आहे. एक-वर्षीय दराचा वापर वाहन, वैयक्तिक आणि गृहकर्ज यांसारख्या बहुतेक ग्राहक कर्जांचे दर निश्चित करण्यासाठी केला जातो.
ओव्हरनाइट, तीन-महिने, सहा-महिने आणि तीन-वर्षांच्या मुदतीचे एमसीएलआर दर 5 बेसिस पॉईंट्सने वाढवून अनुक्रमे 8.10 टक्के, 8.20 टक्के, 8.35 टक्के आणि 8.65 टक्के करण्यात आले आहेत.
पश्चिम आशियाई संकटामुळे वाढलेल्या ऊर्जा किमती आणि पुरवठ्यातील व्यत्यय यांच्या परिणामाचा विचार करून, रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अपेक्षेप्रमाणे सलग दुसर्यांदा व्याजदर अपरिवर्तित ठेवल्यानंतर काही दिवसांनी एमसीएलआर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.




