#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो

अभिनेता 'सोनू सूद' गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे.

मुंबई- बॉलिवूडचा रिअल लाईफ हिरो म्हणजे, अभिनेता ‘सोनू सूद’ हा गेल्या काही महिन्यांपासून अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर विविध भागांमध्ये अडकललेल्या पररराज्यातील स्थलांतरित मजुरांना आपल्या मुळ गावी पोहोचवण्यापासून ते अनेकांना आर्थिक मदत करेपर्यंत शक्य त्या सर्व परिंनी सोनूनं सढळ ह्स्ते मदत केली. अश्याच या रियल लाईफ हिरोचा आज (दि. 30 जुलै) वाढदिवस आहे.

पंजाबमधील मोंगा येथे सोनू सूद चा जन्म झाला असून, तिथंच सोनुने आपलं प्राथमिक शिक्षण घेतलं. मात्र, पुढील शिक्षणासाठी सोनू महाराष्ट्रातील नागपूर शहरात आला. आपलं इंजिनियरिंगच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या अभिनेत्यानं मॉडेलिंगला सुरुवात केली. आजवर कलाविश्वात सोनूच्या वाट्याला खलनायकी भूमिका जास्तीकरून आल्या. मात्र, मोठ्या पडद्यावरील हा खलनायक खऱ्या आयुष्यात एका सुपरहिरोहून कमी नाही. कारण लॉकडाऊन काळात सोनुने अतिशय मोलाचे योगदान दिलं आहे.

दरम्यान, आपल्या वाढदिवसानिमित्त  स्थलांतरीत मजुरांना आणखी मोठं गिफ्ट सोनुने दिलं आहे.  सोनू सूदने  ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. “मी माझ्या प्रवासी भावांसाठी  PravasiRojgar.com येथे 3 लाख नोकऱ्यांसाठी करार केला आहे. येथे काम करणाऱ्यांना चांगला पगार, PF, ESI आणि इतर सुविधा देण्यात येणार आहेत. AEPC, CITI, Trident, Quess Corp, Amazon, Sodexo, Urban Co , Portea आणि इतर लोकांचे मनापासून आभार”. असे त्याने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.