मुंबई – ‘निशब्द’ या चित्रपटाद्वारे अमिताभ बच्चनसोबत बॉलिवूडमध्ये एंट्री करणारी अभिनेत्री ‘जिया खान’चा आज 35 वा वाढदिवस आहे. गजनी, हाऊसफुल अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या. बॉलिवूड स्टार बनण्यासाठी जियानं अभिनय आणि इंग्रजी साहित्याचं शिक्षण घेतलं होत.
जिया खानचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 ला न्यूयॉर्कमध्ये झाला होता. मात्र, 25 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. 3 जून 2013 ला राहात्या घरी गळफास घेत जियाने आत्महत्या केली.
दरम्यान, तिच्या आत्महत्या प्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेन्ड अभिनेता सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. सुरजवर जिया खानच्या प्रकरणाचा खटला अजूनही सुरु आहे. परंतु सुरजचं म्हणणं आहे कि, मी निर्दोष आहे. गेले अनेक वर्ष सूरज पांचोली आणि जिया खानचं रिलेशन होतं. एवढंच नव्हे तर ती चार महिन्यांची गरोदर सुद्धा होती.
जियाची आई राबिया खान यांच्या मते, जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे. अद्याप तिच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.