मुंबई – झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘राधा ही बावरी’ मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री ‘श्रुती मराठे’ चा आज वाढदिवस आहे. श्रुतीचा जन्म ऑक्टोबर 1985 रोजी पुण्यात झाला. मॉडेलिंगपासून करीअरची सुरुवात करणाऱ्या श्रुतीने अभिनेता गौरव घाटणेकर सोबत 2016 साली विवाह केला.
श्रुती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपल्या लाजवाब अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ भाषेतील ‘इंदिरा विजहा’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.
सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असणारी श्रुती आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सतत आपल्या फॅन्ससह शेअर करते असते. मराठी सिनेविश्वातील बोल्ड अँड ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून श्रुतीला ओळखले जाते.
View this post on Instagram
Smile . Laugh . Life is too short to be unhappy 😊😊 Photography- @saneshashank 😊
श्रुतीतीच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य नेहमीच रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आले आहे. म्हणूनच श्रुतीचे फॅन्स तिच्या व्हिडिओ आणि फोटोंवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव करतात.
2014 मध्ये अनेक मराठी कलाकारांनी एकत्र येऊन ‘कलावंत ढोल ताशा पथक’ सुरू केलं. श्रुती त्या पथकाची एक सदस्य आहे. तिला ढोलवादनाची आवड असून दरवर्षी गणपती मिरवणुकांमध्ये ती वादन करताना दिसते.
View this post on Instagram
Pudhchya varshi double josh ! Pakka promise! #gocoronago 😡 Ganapati Bappa Moraya ! ❤