मुंबई – सलमान खान आज 54 वा वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षी सलमान त्याचा वाढदिवस जवळचा मित्र परिवार आणि कुटुंबियांसोबत साजरा करतो. यंदाही सलमानने सोहेल खानच्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
View this post on Instagram
Happy birthday to my most fav person in the world, @beingsalmankhan love and happiness always ????
भाईजानचा जन्म २७ डिसेंबर १९८५ रोजी मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये झाला. त्याचे मूळ नाव अब्दुल राशिद सलीम सलमान खान आहे. सलमानला इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे.
सलमानने बॉलिवूडचे कथालेखक वडील सलीम खान यांचे बोट धरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली असली, तरी त्याचा प्रवास खडतर होता. त्याने बी ग्रेडच्या सिनेमांमध्येही काम मिळवण्याचा प्रयत्न केले होते. काही वेळा तर त्याला शिपायाकरवी बाहेरही घालवून दिले गेले होते. प्रसंगी ७५ रुपये दिवसाच्या मानधनावरही त्याने काम केले आहे.
१९८८ रोजी बिहारींच्या ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून सलमानने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. यानंतर त्याने १९८९ मध्ये आलेला ‘मैंने प्यार किया’ चिपटात मुख्य भूमिका मिळाली.या चित्रपटातील भूमिकेमुळे सलमान प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहचला.
गेली तीन दशके तो बॉलिवूडचा चहेता स्टार आहे. त्याची लोकप्रियता जेवढी आहे, तेवढेच वादही त्याच्या नावावर जमा झाले आहेत. पण त्या सगळ्याला पुरून उरला तो सलमान. आज तो सर्वाधिक कमाई करणारा स्टार आहे आणि मुख्य म्हणजे रोमॅंटिक आणि अॅक्शन अशा दोन्ही स्टाईलच्या सिनेमांमध्ये त्याचे करोडो चाहते आहेत. सलमानचे चित्रपटात येण्याआधी लेखक बनण्याचे स्वप्न होते.
सलमान खानची ‘बीइंग ह्युमन’ ही संस्था गरजवंत लोकांची मदत करते. सलमानने आजपर्यंत अनेक नवे चेहरे फिल्म इंडस्ट्रीला दिले आहेत. लवकरच सलमान ‘भारत’ या सिनेमाद्वारे २०१९ साली ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.