मुंबई – गालावर सुंदरशी खळी आणि ओठांवर खट्याळ हसू असलेल्या ‘प्रिती झिंटा’चा आज वाढदिवस आहे. आज प्रिती बॉलिवूडमध्ये फार अॅक्टिव्ह नाही. पण तिचे चाहते कमी नाहीत. ३१ जानेवारी १९७५ ला हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये प्रितीचा जन्म झाला.
View this post on Instagram
Sunshine after the rain is pure happiness ? #weekendvibes #sunshine #ting ? @ashguptaslife
प्रिती १३ वर्षांची असताना तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. या अपघातात तिची आईदेखील जखमी झाली होती. त्यानंतर प्रितीला अनेक संघषार्चा सामना करावा लागला. पण तिने हार मानली नाही.
मानसशास्त्रात एम. ए केल्यानंतर प्रितीने अनेक जाहिरातींसाठी मॉडल म्हणून काम केले. यानंतर १९९८ मध्ये आलेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ या चित्रपटातून प्रितीला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. पहिल्याच चित्रपटात तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री पुरस्कार मिळाला. ‘दिल से’ चित्रपटात प्रिती केवळ २० मिनिटे दिसली.
केवळ अभिनय आणि व्यवसायातच नव्हे तर प्रिती झिंटा सामाजिक कार्यही करत असते. तिने ऋषिकेश येथील एका अनाथ आश्रमातील ३४ मुलींना २००९ मध्ये दत्तक घेतलं होतं. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिनं घेतली आहे.