#HBD: ‘परिणीती चोप्रा’चा आज वाढदिवस

बॉलिवूडमधील चुलबुली अभिनेत्री परिणीती चोप्राचा आज 30वा वाढदिवस आहे. परिणितीने चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. परिणीती चोप्राचा जन्म २२ ऑक्टोबरला पंजाबमधील अंबाला येथे झाला होता. 12 परीक्षेत परिणीतीने टॉप केले होते. तिने आपले  शिक्षण बिजनेस, फाइनेंस , ट्रिपल हॉनर्स , अर्थशास्त्र विषयात पदवी घेतली.

 

View this post on Instagram

 

Day off = photo session ♟

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

दरम्यान, हिंदीसह तामिळ, तेलगू आणि मल्याळम अशा अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटांसह इतर भाषेतील सिनेप्रेक्षकही तिच्या वाढवीसानिमित्त सोशल मीडियावर आज शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

 

View this post on Instagram

 

?

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

परिणीती केवळ अभ्यास आणि अभिनयातच हुशार नाही. तर ती एक उत्तम गायिकासुद्धा आहे. तिने शास्त्रीय संगीतात बीए केलं आहे. परिणीती चोप्रा अस्सल खवय्यी आहे. पिझ्झा खाण्याची ती प्रचंड मोठी शौकिन आहे. ती पूर्ण दिवस पिझ्झा खावून राहू शकते असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. ‘दावत ए इश्क’ आणि ‘किल दिल’ या चित्रपटांच्या अपयशानंतर परीणीती इतक्या डिपरेशनमध्ये गेली होती की तीने खाणे-पिणे सोडून दिले होते इतकेच नव्हे तर अगदी कुटूंबीयांशी देखील संपर्क तोडला होता.

 

View this post on Instagram

 

My fav thing to do in the world ❤️ @ayushmannk #SingingForLife

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

बॉलिवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित असलेल्या बायॉपिकमध्ये परिणीती झळकणार आहे. या बायॉपिकमध्ये आपली भूमिका सक्षमपणे साकारण्यासाठी ती ट्रेनिंग घेत आहे. परिणीतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत परिणीती बॅडमिंटनच्या कोर्टवर सराव करताना दिसते. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “पहिले आणि आता!’ सायना नेहवाल हे तुला कसे शक्‍य आहे. तसेच या बायॉपिकची शूटिंग ऑक्‍टोंबरमध्ये सुरू होणार असल्याची माहितीही तिने दिली.

 

View this post on Instagram

 

Me. All day everyday nowadays?

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

Leave A Reply

Your email address will not be published.