#HBD MJ : ‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन 

पॉप स्टार मायकल जॅक्सन यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण जगावर शोककळा पसरली होती. गाण्यांनी आणि डान्सने संपूर्ण जगाला आपल्या तालावर नाचायला लावणारे मायकल जॅक्सन यांची आज ६० वी जयंती आहे. १९७०च्या दशकात केवळ एकट्याने गाणे गात सुरु केलेला प्रवासात ८०व्या दशकात मायकल संगीताच्या जगातला बेताज बादशहा बनला. त्यांच्या डान्स स्टेपची युवकांमध्ये आजही क्रेझ आहे.

मायकल जॅक्सनचा जन्म २९ ऑगस्ट १९५८ रोजी अमेरिकेतील इंडियन प्रांतातील छोट्याशा शहरात झाला होता. १९६४ साली मायकल यांनी आपल्या सहा भावांच्या ‘जॅक्सन-५’ या बँड ग्रुमध्ये सामील झाले. व त्यांच्या संगीताचा प्रवास सुरु झाला. ८० च्या दशकात मायकल यांनी संगीत जगतात आपली एक वेगळी ओळख बनवली. त्यांच्या गाण्याचे ‘बिट इन’, ‘बेले जीन’ आणि ‘थ्रिलर’ हे अल्बम १९८२ साली रिलीज झाले व त्यांना जागतिक प्रसिद्धी मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

९०च्या दशकात ‘ब्लॅक अँड व्हाईट’ आणि ‘स्क्रीम’ने हे अल्बम गाजले. ‘थ्रिलर’ या अल्बमच्या जगभरात जवळपास ६५ लाख प्रति विकल्या गेल्या आहेत. व ते संगीतातील ‘किंग ऑफ पॉप’ बनले. ‘रॉक अँड रोल हॉल’च्या फेम मध्ये मायकल जॅक्सन दोनदा सामील झाले आहेत. त्यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रम आहेत. तर १३ ग्रॅमी अवॊर्ड जिंकणारे जॅक्सन एकटेच कलाकार आहेत.

मायकल जॅक्सन यांचे गाण्यांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले आहेत. मायकल जॅकसन यांनी आपल्या ३० वर्षातील करियरमध्ये १०० कॉस्मेटिक सर्जरी केल्या आहेत. तर त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा आरोपही लागला होता. शिवाय ते ड्रग्सच्या आधीन गेले होते. २५ जून २००९ मध्ये वयाच्या ५० व्या वर्षी मायकल जॅक्सन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)