कंपनीकडून नवीन लोगो सादर
नवी दिल्ली : गुगलच्या गुगल मॅप्सने लोकांची अनेक कामे सोपी झाली आहेत. एखाद्या अनोळखी ठिकाणी जायचे असेल तर सर्व जण सर्रासपणे गुगल मॅप्सकडे वळतात. याच गुगल मॅपचा आज वाढदिवस असून गुगल मॅप्सला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत.
गुगल मॅप्सला 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने नवीन लोगो सादर केला आहे. यासोबतच मॅप्ससाठी काही नवे फीचर्सही रोलआऊट करण्यात आले आहेत. Google Maps च्या जुन्या आयकॉनमध्ये मॅप आणि एक लोकेशन पिन केलेले दिसायचे. तर नव्या लोगोमध्ये मिनिमल डिझाइन व्हाइट बॅकग्राउंड आणि राउंड edges दिले आहेत. हा लोगो बराच कलरफुल बनवण्यात आला आहे.
Happy 15th Birthday @GoogleMaps! Reflecting today on some of the ways it’s been helpful to me, from getting around more easily to finding a good veggie burrito wherever I am:) Thanks to the support of our users, Maps keeps getting more helpful every day.https://t.co/Q4ky0pEpC3
— Sundar Pichai (@sundarpichai) February 6, 2020
कंपनीचे CEO सुंदर पिचाई यांनी एक ब्लॉग लिहून गुगल मॅप्सला शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल मॅप्सला मुळे लोकांचे जीवन सोपे झाल्याचे त्यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. याशिवाय, फुड डिलिव्हरी करणारे मॅप्सद्वारे तुमच्यापर्यंत जेवण कसे पोहोचवतात हे देखील लिहिले आहे. 15 व्या जन्मदिवसाच्या शुभेच्या गुगल मॅप्स…आजपर्यंत मॅप्समुळे मी ज्याठिकाणी माझ्या आवडीचे व्हेज बरितो(खास डिश) खाऊ शकलो त्या जागा दाखवतोय, असे त्यांनी लिहिले आहे.
नव्या आयकॉनसोबत मॅप्समध्ये एक्सप्लोर, कम्यूट, Saved, कन्ट्रिब्यूट आणि अपडेट्स मोड हे नवे टॅब दिले आहेत. एक्सप्लोर टॅबद्वारे एखाद्या लोकेशनच्या आजूबाजूच्या जागा सर्च करता येतील. कम्यूट टॅबद्वारे कुठेही जाण्याचा रस्ता शोधता येईल. Saved पर्यायामध्ये जर एकदा तुम्ही घराचा आणि ऑफिसचा पत्ता टाकला तर मॅपवर सेव्ह होईल. अपडेट्स टॅबमध्ये युजर्सना जवळचे खास स्पॉट दाखवले जातील. तर, कन्ट्रिब्यूट टॅबमध्ये तुम्ही कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करु शकतात. यामुळे एखादं ठिकाण कसं आहे याची माहिती सर्व युजर्सना मिळेल. नेव्हिगेशन फीचर्स पुरवणाऱ्या गुगल मॅप्स या गुगलच्या लोकप्रिय सर्व्हिसला 15 वर्ष पूर्ण झाली आहेत.